जळगाव – शहरातील फुले मार्केट वादग्रस्त आहे.घाण,वाद, कोर्ट,हप्तेखोरी ,खंडणी , अतिक्रमण या मार्केट चे वैशिष्ट्ये आहेत.येथील या मुख्य प्रवेशद्वारात ही घाण प्रत्येक गिऱ्हाईकाचे चिखलाने स्वागत करते.येथे आले म्हणजे हा चिखल पायांना, कपड्यांना, साडीला,गाडीला लागून गिऱ्हाईक घरी नेतात.हे रोगराई चे सरकारी मोफत वितरण केंद्र आहे.हे कसे बंद होईल?याचा शोध कोणत्याही अधिकारी, पुढारी, आमदार, मंत्री, वैज्ञानिकांना लागला नाही .तो लावला येथील एका महिलेने.साबुदाणा,खिचडी,वडे,पकोडे विकणाऱ्या महिलेने.त्यांनी सांगितले की,हा रस्ता जर अर्धा फुट वर केला तर येथे पाणी साचणार नाही.चिखल होणार नाही.रोगराई पसरणार नाही.गांधीजींना वाईट वाटणार नाही.शिवराम पाटलांना विषय मिळणार नाही.
येथेच भिंतीवर गांधीजींचे चित्र, चष्मा व स्वच्छ भारत मिशन असे रंगवलेले आहे.किमान ते तरी रंगवायला नको.एकतर गांधीजींना या घाणीपासून दूर ठेवा किंवा घाणीला गांधीजी पासून दूर ठेवा.हेच जळगाव महापालिकेला जमत नाही.अनेक महापौर आलेत गेलेत.कमाई करून श्रीमंत झालेत.तेच आजी माजी महापौर उद्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहेत.सांगतील, साहेब जमले तर मला आमदारकीचे तिकीट द्या.मी जळगाव चे मळगांव करून दाखवणार आहे.
याच घाणीचे वर महानगरपालिकेने “शासन आपल्या दारी”चे बैनर झळकावलेले आहे.त्या ऐवजी चिखल आपल्या दारी,रोगराई तुमच्या घरोघरी,असे लिहीले पाहिजे होते.योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी असे म्हटलेले आहे.त्याऐवजी योजना विनाशकारी ,नेते सरकार घरोघरी,असे लिहीले पाहिजे होते .जर हे असे गौडबंगाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना कळले किंवा कोणी सांगितले तर त्यांना खूप राग येईल.म्हणतील,
” कौन बेवकुफ है,जिसने हमारी फोटू यहां किचड पर लगा दी?कहीं और जगह नहीं मिली क्या?ये तो हमारी तोहिंन है.”












