जळगाव शहरातील शिवाजी नगरात एका व्यावसायिकाच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. वाळूवरून असलेल्या जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक माहिती आहे.
जळगाव – जळगाव शहरातील शिवाजी नगरात एका व्यावसायिकाच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. वाळूवरून असलेल्या जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी एक जणाला ताब्यात घेतल आहे.
जळगावांतील केसी पार्क परिसरात त्रिभुवन कॉलनी अशोक माने यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना आज रात्री घडली आहे. अशोक माने हे त्यांच्या कुटुंबीयासह घरात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरावर दगडफेक केली तसेच गोळीबारही केला.
दरम्यान माने यांचा मुलगा हा वाळू व्यावसायिक असून, वाळूच्या जुन्या वादातून माने यांच्या घरावर हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यावर जळगाव शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी याच परिसरातील गोळीबाराची घटना ताजी असताना पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने पोलिसांचा धाक संपला की काय असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गोळीबार झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. मात्र या घटनेत कोणालाही कुठलीही इजा अथवा कोणी जखमी झालेले नाही. जुन्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दोन ते तीन राऊंड या ठिकाणी फायर झाल्याचे पोलिसांचं म्हणणे असून, नेमकं कारण आणि संशयित कोण याचा तपास सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली आहे. याप्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले असून, हा हल्ला करणारे संशयित निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
अशोक माने हे त्यांच्या कुटुंबासोबत घरात असताना अचानकपणे दगडफेक झाले दगडांचा आवाज आल्यावर पाहण्यासाठी गेले असता अचानक गोळीबाराचा आवाज आला. त्यामुळे सर्व कुटुंब घाबरले पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. गेल्या सात महिन्यांपासून ज्यांनी गोळीबार केला ते खंडणीसाठी मुलाच्या मागे लागले आहेत. त्यातूनच त्यांनी आज हा हल्ला चढवण्याची शक्यता अशोक माने यांनी व्यक्त केली आहे.