जळगाव (प्रतिनिधी):-जळगाव जिल्हा कोळी समाज विकास मंच यांच्या सौजन्याने रिधुर येथील श्रीक्षेत्र, अवचित हनुमान मंदिर परिसरात कोळी समाजाचा वधू-वर सूचक व पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी सभापती प्रभाकर सोनवणे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर चोपडा, एडवोकेट गणेश सोनवणे, डी.पी.साळुंखेसर, राजेंद्र रायसिंग, सुरेश सोनवणे, बंडू कोळी, कैलास बाविस्कर, किशोर बाविस्कर, योगराज सपकाळे, जनार्दन सपकाळे, सुभाष साळुंखे, भगवान कोळी, महेंद्र सोनवणे, सौ.ललिताताई पाटील, सौ.हेमलता सोनवणे, ममता सोनवणे, बाळासाहेब सैंदाणे, पत्रकार महेंद्र सोनवणे, संदीप कोळी, सुभाष सोनवणे, दीपक तायडे, भगवान कोळी, भरत पाटील, निर्मला कोळी, भिकाभाऊ सोनवणे, गुलाबराव बाविस्कर, डॉ.गोकुळ बिराडे, गंभीरराव उन्हाळे, राज सपकाळे, सुकलाल कोळी, ज्ञानेश्वर सोनवणे, दिनकर सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते श्री अवचित हनुमान व महर्षी वाल्मिकींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा आयोजकांतर्फे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मेळाव्याचे आयोजक नारायण झगु कोळी (साकरीकर) यांनी केले. मान्यवरांनी ह्या समाजकार्याबद्दल आपल्या भाषणात गौरवोद्गार काढलेत. तसेच मान्यवरांच्या शुभहस्तेही आयोजकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुका व जिल्हाभरातील शेकडों वर-वधूंनी आपला परिचय दिला. याठिकाणी हज्जारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाधान बाविस्कर विदगावकर, अरूण केशव साळुंके, कैलास सोनवणे, भूषण कोळी, मुरलीधर पाटील, शंकर सपकाळे, चंद्रशेखर कोळी, नितीन सपकाळे, प्रवीण बाविस्कर, चुडामण पाटील, बापू कोळी, गणू सपकाळे, ज्ञानेश्वर सपकाळे, उमाकांत पाटील, अशोक सोनवणे, भास्कर पाटील, अण्णा सपकाळे, गोरख सोनवणे, जगदीश पाटील, भिकन सपकाळे, किशोर बाविस्कर, राजेंद्र पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
सूत्रसंचलन महेश सोनवणे, जयश्री सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन नारायण कोळी यांनी केले.











