जेलमध्येच कैद्याने लगावली थेट पोलिसाच्या कानाखाली

0
2

ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मठेपेची शिक्षा असलेल्या एका कैद्याने ठाणे जेलमधील एका पोलीस कर्मचाऱ्याला संतापाच्या भरात कानशिलात मारली. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने पुन्हा एकदा पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभारण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कैदी अविनाश अशोक जाधव याला मुंबई येथील सेशन कोर्टात आणण्यात आले होते. तिथून त्याला पुन्हा कारागृहमध्ये परत आणताना त्याला त्याचा भाऊ काही तरी खायला देत होता. याचदरम्यान उपस्थित पोलीस अंमलदार यांनी कैदीच्या भावाला दूर केलं. त्याचा राग मनात धरून आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात दिली. इतकंच नाही तर, ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारावर कैद्याने पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम BNS १३२, ११५(२), ३५२, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास ठाणेनगर पोलीस ठाणे करीत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Spread the love