सन 2012 पटपडताळणी नंतर बंदी काळात देखील बोगस शिक्षक भरती

0
32

चेअरमन, सचिव, मुख्याध्यापक,मान्यता देणारे शिक्षण विभागातील कर्मचारी रडारवर

जळगाव – पटपडताळणी नंतर बंदी काळात शिक्षक भरती करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जळगाव जिल्ह्यातून करण्यात येत आहे. सन 2012 साली राज्य शासनाने सर्वच शाळांची एकाच दिवशी पटपडताळणी केली होती.

त्या पडताळणीत बऱ्याच बनावट तुकडया व कागदोपत्री शाळा व त्याठिकाणी चार पटीने कर्मचारी भरती केल्याचे समोर आले होते. व प्रत्येक वर्गात विद्यार्थी यांची मोजणी केली असता एकाच विद्यार्थ्यांची ऍडमिशन दोन ते तीन शाळेत दाखवून संस्था चालकांनी पटसंख्या वाढवून घेतल्याचे समोर आले होते

पटपडताळणी नंतर खरी विद्यार्थी संख्या समोर आल्यावर बऱ्याच बनावट बोगस वाढीव तुकडया बंद पडल्या होत्या. व त्या तुकडीवर कार्यरत 2000 च्या आसपास शिक्षक सरप्लस झाले होते.

त्यानंतर राज्य सरकारने एक जि आर काढून जोपर्यंत या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन इतर शाळेतील रिक्त जागेवर केले जात नाही तोपर्यंत नवीन शिक्षक भरती करणे आणि पेपरला जाहिरात देण्यावर सर्व शाळांना बंदी घातली होती.

तरी देखील जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागातील काही भ्रष्ट मंडळींनी या आदेशाचा भंग करून शेकडो बोगस शिक्षक बॅक डेट दाखवून सन 2012 च्या शिक्षक भरतीच्या बंदी काळात भरती केल्याची माहिती मिळत आहे. आणि अजूनही बरेच बोगस प्रस्ताव त्या काळातील तारीख टाकून या विभागाच्या टेबलावर पडले आहेत.

यासाठी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागातील काही भ्रष्ट कर्मचारी पैसे घेऊन मदत करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

तरी सरकारने पोलीस चौकशीत सन 2012 च्या पटपडताळणी नंतर शिक्षक भरती बंदी काळात एकूण किती शिक्षकांना कोणीकोनी मान्यता दिल्या आहेत. त्या प्रस्तावावर ज्या पण अधिकारी, कर्मचारी यांच्या सह्या असतील त्यान्च्या सह त्या शाळेचे चेअरमन, सचिव आणि मुख्याध्यापक यांच्या वर गुन्हे दाखल करून त्याना चौकशी साठी ताब्यात घेण्याची मागणी होत आहे.

Spread the love