सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथील वार्ड क्रमांक दोन मध्ये भुसावळ तालुका आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहे.
मात्र काही भाग हा अजूनही जैसा थे आहे त्यामुळे वार्ड क्रमांक दोन मधील नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे वास्तविक पाहता काही गावात जास्तीत जास्त सिमेंट रस्ते आहेत काही रस्ते तर दहा वर्षे उलटून गेली तरी ही चांगले आहेत.तर काही भागात दोन वेळा रस्ता करुनही रस्ता नाही आता पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे बोलले जात असले तरी काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी या कडे लक्ष घालावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.