राज्यात अवकाळी पाऊस गारपिटीचा इशारा

0
48

महाराष्ट्र –  समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भासह नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीसह काही भागांत गडगडाटासह गारपिटीसह अवकाळी पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर मुंबईत अजून दोन दिवस ढगाळ हवामान राहणार असल्याचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिह्यांत 16 मार्च व शुक्रवार, 17 मार्च रोजी अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. मुंबईतही पुढील दोन दिवस वातावरण ढगाळ राहणार असल्याचे हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी सांगितले.

Spread the love