पोखरा योजनेत उर्वरित गावांचा समावेश करावा तसेच नरेगा अंर्तगत मजुरांना मजुरीचे वेतन त्वरीत द्यावे लोकसंघर्ष मोर्चाचे तहशिलदार यांना निवेदन

0
13

रावेर प्रतिनिधी– राजेंद्र महाले

रावेर:तालुक्यातील सर्व नरेगा अंतर्गत मजुराला सात दिवसाच्या आत त्यांचे मेहनत मजुरीचे वेतन मिळावे व आदिवासी बहुल क्षेत्रात तात्काळ कामे उपलब्ध करून द्यावीत. त्याचप्रमाणे ज्यांचे जॉब कार्ड असतील व आधार लिंक नाही त्यांचे आपल्या स्तरावरून आधार लिंक करण्यात यावे. आदिवासी पेसा क्षेत्रातील जी गावे पोखरा अंतर्गत नाहीत त्यांना पोखरा योजनेत समाविष्ट करण्यात यावीत. तसेच पेसा क्षेत्रात राहणारे नागरीक ज्या जागेवर राहत असतील त्या जागेवर ड यादीतील नागरीकांना घरकुल मंजुर करून द्यावे तसेच शबरी घरकुल योजनेचे टार्गेट वाढवून मिळावे.

त्याचप्रमाणे रावेर तालुक्यातील जे वनदावे प्रलंबीत आहेत ते त्वरीत मार्गी लावण्यात यावी, जोपर्यंत या वनदाव्यांचा निकाल लागत नाही तोपर्यंत वनविभागाने कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये. आपल्या स्तरावरून आदिवासींचे रेशन कार्ड बनवून दिले आहेत त्यांना त्वरीत धान्य सुरू करून द्यावे, जे बाकी आहेत त्यांचे रेशन कार्ड त्वरीत बनवून द्यावेत अशा अनेक मागण्या आदिवासी लोक संघर्ष मोर्चा चे नुरमोहंम्मद तडवी यांनी रावेर तहसीलदार यांना निवेदन देत केली आहे.

Spread the love