सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – ‘ गाव करील ते राव करील काय ‘ या अर्थाची एक म्हण आहे .त्याला अनुसरून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे तत्कालीन पो नि विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनसगाव येथे ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली .या दलात जवळपास तीस ते चाळीस गावातील तरुण युवक गावाच्या सुरक्षा कवचाचे काम करीत आहेत.गावात रात्रीच्या वेळी गस्त घालत आहेत. या सर्व जवानांना भुसावळ तालुका पोलीसांचे मार्गदर्शन लाभत असून ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांना भेटण्यासाठी दररोज तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी रात्री पेट्रोलिंग साठी येत असतात . या ग्राम सुरक्षा दलाचे जवान दररोज गावातून भटकंती करीत असल्याने चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे तसेच रात्रीच्या वेळी गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्ती , वाहने यांची ओळख पटल्या शिवाय गावात प्रवेश दिला जात नाही .या परिसरात रस्त्यावर काही अपघाती घटना घडल्या ग्राम सुरक्षा दलाचे जवान लगेच धाव घेऊन सहकार्य करतात .
सध्या सुनसगाव ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांचे कार्य जिल्ह्यात आदर्श निर्माण करणारे आहे . इतर गावातील तरुणांनी सुनसगाव च्या ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांचा आदर्श घ्यावा.असे स्वातंत्र दिनी भुसावळ विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे व भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सतिश कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी कुऱ्हा पानाचे औट पोष्ट चे बीट हवालदार व पोलीस कर्मचारी यांनी सुध्दा ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांचे कौतुक केले.