वराडसिम येथे भारतीय संविधान स्मारकाचे उद्घाटन !

0
37

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ -: तालुक्यातील वराडसिम गावी भारतीय संविधान स्मारकाचे उद्घाटन उपसरपंच सौ वैशाली झारखंडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. संविधान स्मारकाचे उद्घाटन झाल्यानंतर विलास पाटील यांनी प्रास्तविक करताना सांगीतले की आम्ही भाग्यशाली आहोत आमच्या हातून पवित्र अशा सुविधा स्मारकाचे उद्घाटन होत आहे आणि वराडसीम ग्रामपंचायती चे सर्व पदाधिकारी ,अधिकारी यांच्या एकमताने संविधान स्मारकाचा ठराव मंजूर केला होता असे सांगितले.त्या नंतर श्री हिवरे सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की संविधान लिहिण्याला २ वर्ष ११ महिने १८ दिवस इतका कालावधी लागला परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले हे संविधान अत्यंत सुंदर आहे भारतीय सर्व घटकांचा या ठिकाणी विचार आहे परंतु त्या संविधांनाला चालवणारे लोक सुद्धा चांगले असतील तर ते संविधान लोकांना कळेल असे सांगीतले. ग्रामपंचायत सदस्य शरद सपकाळे यांनी वराडसिम गावात संविधान स्मारक व्हावे अशी मागणी ग्रामपंचायत सभेत केली होती .या मागणीला सर्व सदस्यांनी एक मताने मंजूरी दिली होती त्यामुळे २६ नोव्हेंबर रोजी वराडसिम गावात सुंदर असे संविधान स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी सिद्धार्थ नगर , डाँ बाबासाहेब आंबेडकर नगर व ग्रामपंचायत तसेच गावातील पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरीक ग्रामस्थ व भिम बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love