उद्योगमंत्री उदय सामंत यांचा अलिबाग येथे अपघात

0
37

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अलिबाग येथे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अलिबागच्या मांडावा येथे ही दुर्घटना घडली आहे. उदय सामंत यांची बोट अलिबागच्या मांडवा जेटीला धडकल्याने हा अपघात झाला आहे. दरम्यान या बोटीवरील सर्वजण सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र या अपघाताबाबत अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

Spread the love