धुळ्यात 3081 रिक्त पदांसाठी मुलाखती; या संकेतस्थळावर करा नोंदणी

0
16

धुळे – येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे सोमवारी (ता. १०) सकाळी दहा ते दुपारी पाचपर्यंत एसआरपीएफ मैदानावर (सुरत-बायपास मार्ग) शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (ऑफलाइन-२) होणार आहे.

त्यात वीस कंपन्यांमधील तीन हजार ८१ रिक्त जागांसाठी मुलाखती होतील.

मेळाव्यात दहावी पास किंवा नापास/बारावी/आयटीआय/बीए/बीकॉम/एमकॉम/बीएससी/डिप्लोमा इंजिनिअर/बीई/डिप्लोमा अॅग्री/बीएस्सी अॅग्री/एमएससी अॅग्री /एमबीए/ एएनएम या पात्रताधारक उमेदवारांसाठी तीन हजार ८१ रिक्तपदे उपलब्ध असून, प्रत्यक्ष मुलाखतीसाठी विविध २० कंपन्या व आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच कौशल्य विकास व स्वयंरोजगाराबाबत विविध महामंडळांचे स्टॉल्स लावून विविध अर्थसहाय्य योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

रोजगार मेळाव्यामध्ये महेंद्र अॅन्ड महेंद्र १५० पदे, डिस्टिल एज्युकेशन अॅन्ड टेक्नॉलॉजी प्रा. लि. २०० पदे, नवभारत फर्टिलायझर लि. २७ पदे, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ६० पदे, आयसीआय बॅक सेल्स अॅकॅडमी ७० पदे, युवाशक्ती स्किल

इंडिया प्रायव्हेट लिमिटेड १०० पदे, राज कन्सल्टन्सी सव्हिर्सेस १०० पदे, क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड, धुळे १५० पदे, पीपल ट्री व्हेंचर्स प्रा.लि. ७० पदे, परम स्किल्स ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लि., औरंगाबाद ५० पदे, क्यूस कॉर्प प्रा. लि. ६१४ पदे, हिताची एस्टेमो ब्रेक सिस्टिम्स इंडिया प्रा. लि., जळगाव २५० पदे, एक्सेल प्लेसमेंट्स ५०० पदे, दर्पण रोजगार केंद्र, जळगाव ५० पदे, प्रोसॉफ्ट प्लेसमेंट्स, धुळे ७५ पदे, जस्ट डायल ५० पदे, नवभारत बायो प्लॉ टेक लि. २० पदे, आरीअन रोप्स प्रा.लि., धुळे ३० पदे, राहुल एन्टरप्राइजेस १० पदे, सुझलॉन एनर्जी लि. ५ पदे, मायक्रोन लोगी ५०० पदे रिक्त आहेत.

मेळाव्यासाठी संबंधित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहतील. पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत. या संधीचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा. तसेच रोजगार इच्छुक उमेदवारांनी किमान पाच प्रतीत रिझ्यूम/बायोडाटा आणि शैक्षणिक कागदपत्रे आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी छायाप्रतीसह सकाळी दहाला उपस्थित राहावे.

इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. तसेच यापूर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास या सुधारित संकेतस्थळावर आपला १५ अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावे आणि मोबाईल, आधार क्रमांक पडताळणी करावा.

या वेबपोर्टलवर लॉग-इन करून जॉब फेअर टॅबवर क्लिक करून शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत रोजगार मेळावा (ऑफलाइन-२) यात पात्रतेप्रमाणे विविध कंपन्यांच्या उपलब्ध रिक्त पदांसाठी अॅप्लाय करावे. तसेच शंकानिरसन होण्यासाठी ०२५६२-२९५३४१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त रा. नि. वाकुडे यांनी केले.

Spread the love