जळगाव हादरले; जमिनीच्या वादातून चुलत भावाची हत्या

0
35

मुक्ताईनगर – : वडिलोपार्जित असलेल्या शेत जमिनीवरून जुना वाद होता. हा वाद उफाळून आल्याने चुलत भावाने हत्याराने वर करत आपल्या भावाची हत्या केल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी शिवारात समोर आली आहे.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथील सुनील रामसिंग चव्हाण (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव (JSNN)आहे. सुनील चव्हाण हा शेती आणि मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करत होता. दरम्यान सुनील व त्याचा चुलतभाऊ प्रवीण जगन चव्हाण यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून शेतीच्या जमिनीवरून वाद सुरू होता. हा वाद पुन्हा उफाळून आल्याने वादातूनच सदर घटना घडल्याचे समोर आले आहे.

 

Spread the love