तिरंगा फाडणाऱ्या मुख्याध्यापकास जन्मठेप झालीच पाहिजे.. जगन्नाथ बाविस्कर 

0
12

चोपडा (प्रतिनिधी)भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आपणा सर्वांसाठी आन बान शान आहे. भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेकांनी बलिदान दिलेले आहे. प्रत्येक भारतीय राष्ट्रीय सणांच्या वेळेस राष्ट्रध्वजास वंदन करतांना “भारत माता की जय”, “वंदे मातरम्ं”, “मेरा भारत महान”, “आय लव माय इंडिया”, “झंडा ऊंचा रहे हमारा”, “जान से प्यारा तिरंगा हमारा” अशा घोषणा देऊन देशप्रेम व्यक्त करीत असतात. परंतु झारखंड मधील घाटशिला येथील सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने भारताच्या राष्ट्रध्वजाचे कात्रीने तुकडे करून त्याचा फळा पुसण्यासाठी डस्टर म्हणून वापर केलेला आहे. विद्यार्थ्यांनी पालकांना ही गोष्ट सांगितली असता तेथील ग्रामस्थांनी शाळेला घेराव घालून मुख्याध्यापक शफक इक्बाल याची शाळेतून हकालपट्टी करावी अशी मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी या देशद्रोही मुख्याध्यापकाला अटक करून राष्ट्रध्वज का फाडला ? असे विचारले असता त्याने निर्लज्जपणे सांगितले की, राष्ट्रध्वज जुना झालेला होता व फळा पुसायला डस्टर नव्हते म्हणून राष्ट्रध्वज फाडला. याआधीही त्याने शाळेत श्रीसरस्वती देवीच्या पूजेला विरोध करून पूजा थांबवली होती. याबाबत त्याने राष्ट्रिय एकता, अखंडता, बंधुभाव, कायदा, शांतता, सुव्यवस्था व सर्वधर्मसमभावाचे पालन केलेले नाही. म्हणून त्याचे भारतीयत्व रद्द करावे. त्याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जन्मठेपेची शिक्षा झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी चोपडा येथील अध्यात्मिक धार्मिक सामा. कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकांन्वये केली आहे.

Spread the love