जळगाव :- जिल्हा प्रशासनातर्फे ‘जलजागर जलसंधारण स्पर्धा 2024-25’ ची घोषणा करण्यात आली असून, ही स्पर्धा जागतिक पर्यावरण दिनाच्या (5 जून) पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील जलसंपदेचे शाश्वत व्यवस्थापन आणि जनजागृती या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जात असून, वैयक्तिक व संस्थात्मक पातळीवर जलसंवर्धन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी स्पर्धा असून जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिक, शेतकरी, संस्था व खाजगी घटकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
स्पर्धेचे उद्दिष्ट व स्वरूप :
- पाण्याचा शाश्वत वापर, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण जलसंधारण उपायांना प्रोत्साहन.
- ग्रामीण व शहरी गटांत, वैयक्तिक आणि संस्थात्मक अशा दोन प्रकारांमध्ये स्पर्धा घेतली जाणा आहे.
- शेततळी, पावसाचे पाणी साठवण यंत्रणा, बंधारे, गाळ साठवण तलाव, घर किंवा सोसायटीमधील जलसंधारणाची कामे तसेच इतर नाविन्यपूर्ण उपक्रम.
- या संरचना 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मे 2025 दरम्यान पूर्ण झालेल्या असाव्यात.
पात्रता व अर्ज प्रक्रिया अशी..
- जिल्ह्यातील कोणतेही व्यक्ती, संस्था किंवा घटक सहभागी होऊ शकतात.
अर्जाची लिंक
- 21 मे ते 31 मे 2025 या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत.
- या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्जासोबत सादर करावयाची माहिती अशी..
- संरचनेची माहिती
- छायाचित्रे किंवा व्हिडिओ
- पाण्याची बचत व सामुदायिक लाभ
आवश्यक कागदपत्रे..
- मूल्यांकनाचे निकष (100 गुणांमध्ये असेल)
- नाविन्य, पाण्याची बचत, शाश्वतता, सामुदायिक सहभाग, पर्यावरणीय योगदान.
- 1 ते 4 जून दरम्यान समितीद्वारे प्रत्यक्ष पाहणी.
- 5 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता संकेतस्थळावर विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येतील.
- विजेत्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि प्रोत्साहनपर बक्षिसे प्रदान करण्यात येतील.
ही स्पर्धा जलसंपदेचे संरक्षण, भूजल वाढ व पर्यावरणीय संतुलन साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणारे आहे. ग्रामपंचायती, स्थानिक संस्था व माध्यमांद्वारे यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना या अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे एक पाऊल जलसंपन्नतेकडे टाकले जाणार आहे.