जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती अध्यक्षपदी गिरीश नेमाडे , कार्याध्यक्षपदी पी ए पाटील यांची निवड.

0
25

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ -: दि. 11 ऑगस्ट 2025 सोमवार रोजी भुसावळ येथे माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीची सहविचार सभा संपन्न झाली. प्रा. शरद पाटील यांचे निवासस्थानी झालेल्या बैठकीस जिल्ह्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतरांच्या सोळा संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सहविचार सभेचे अध्यक्षस्थानी बी.जे.पी.शिक्षक आघाडीचे राज्य पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षण तज्ञ प्र.ह.दलाल होते.

समितीचे समन्वयक तुळशीराम सोनवणे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून विषयानुसार सभेला सुरुवात केली. समन्वय समितीचे अध्यक्ष नारायण वाघ यांनी आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळातील समितीच्या कार्याचा आढावा सांगितला.

समन्वय समितीच्या बळकटीकरणासंदर्भात समिती सदस्य विनोद महेश्री, आर एस अडकमोल यांनी सूचना मांडल्या. तर समन्वय समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक पी. एस. सोनवणे, डॉ. मिलिंद बागुल, शुद्धोधन सोनवणे यांनी समन्वय समितीच्या कार्यपद्धती विषयी मार्गदर्शन केले.

समन्वय समितीच्या सूचनेनुसार नारायण वाघ यांच्या अध्यक्षपदाचा व गोविंदा पाटील यांच्या कार्याध्यक्ष पदाचा दोन वर्षाचा यशस्वी कार्यकाल पूर्ण झाल्याने पुढील दोन वर्षासाठी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश नेमाडे यांची समन्वय समितीच्या अध्यक्षपदी तर महाराष्ट्र कलाध्यापक महामंडळाचे पी ए पाटील यांची समन्वय समितीच्या कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. मा.अध्यक्ष, नूतन अध्यक्ष, कार्याध्यक्ष , तसेच बामणोद येथील माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल आर. एस. अडकमोल आणि महिला प्रतिनिधी सुनीता पाटील व सुनिता खडके यांचा समन्वय समितीकडून सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात शिक्षणतज्ञ प्र.ह.दलाल शिक्षण क्षेत्रात असलेल्या समस्या व त्यावरील उपायांची कार्यपद्धती यावर मार्गदर्शन केले.

यावेळी शिक्षक मित्र  शैलेंद्र उर्फ छोटू खडके  समन्वय समितीचे उपाध्यक्ष आर. एस. पाटील जळगाव, देवेंद्र तायडे भुसावळ, पी.बी.नरवाडे, बोदवड, प्रभाकर बोरसे वरणगाव, सचिव  एस. एस. अहिरे भुसावळ, सहसचिव  कृष्णराव विसावे पारोळा, खजिनदार सुनील वानखेडे भुसावळ,  प्रसिद्धीप्रमुख प्रवीण धनगर जळगाव, डी एस पाटील जामनेर, संजय पाटील भडगाव.  महिला प्रतिनिधी  सुनिता खडके, सुनीता पाटील.  कार्यकारी सदस्य  संतोष कचरे, विनोद महेश्री, विकास चौधरी, प्रा. शरद पाटील, नितीन भालेराव, प्रदीप सोनवणे, विनोद पाटील पारोळा, कुमार मगर चाळीसगाव, किरण पाटील चोपडा, गजानन कंखरे पाचोरा, अनिल अहिरे धरणगाव, चंद्रकांत देशमुख रावेर, बि.डी.शिरसाट, हेमंत सावकारे, किरण तायडे, किशोर भाऊ घुले, प्रवीण गुरव मार्गदर्शक डॉ. संजू भटकर हे उपस्थित होते. समन्वयक तुळशीराम सोनवणे यांनी आभार मानले.

Spread the love