जळगाव -: जळगाव -किनगाव रस्त्याच्या कामाला जवळपास चार माहिन्यापूर्वी सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये सुरुवातीला जळगाव ते विदगाव या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठ्या मोऱ्याचे खड्डे खोदुन त्यामध्ये मोठे सिमेंटचे पाईप टाकले जात आहे. एका मोरीच्या कामाला जवळपास पुर्ण व्हायला एक ते दिड माहिना लागतो. मोरीचे खड्डे मोठे असल्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो.
या रस्त्यावरून प्रवास करणे अतिशय जोखमीचे झाले आहे. या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
मंगळवार (दि.24) रोजी म्हाळसादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ मोरीचे कामासाठी मोठे खड्डे खोदले आहे पर्यायी बाजुने वाहातुकीसाठी रस्ता देखील काढलेला आहे. परंतु बाजुने वाहातुकीसाठी काढलेल्या रस्त्याजवळ हायलाईट फलक लावलेला नसल्यामुळे जळगाव कडुन ममुराबादकडे येत असलेल्या मोटारसायकलचा मोठा अपघात झाला आहे. दोन्ही मोटारसायकल स्वार मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आगोदर देखील जळगाव विदगाव रस्त्यावर मोऱ्यांच्या ठिकाणी अनेक अपघात झाले आहे. या होणाऱ्या अपघातामध्ये एखाद्याचा जिव गेल्यास त्याला जबाबदार कोण ?
अनेकवेळा ठेकेदाराशी फोनवर देखील सदर विषयावर बोलणे झालेले आहे.रात्रीच्या वेळेस रस्ता दाखवणारे हॉयलाईट फलक ठिकठिकाणी लावले गेले पाहिजे. असे असुन देखील ठेकेदाराकडून कोणत्याच प्रकारची दखल मात्र घेण्यात आलेली नाही. यामुळे वाहातुक दारांना आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
जळगाव विदगाव रस्ता नागरिकांच्या कायम वापरातील रस्ता आहे. या परिसरातील बहुतांशी कामगार औद्योगिक वसाहतीमध्ये तसेच जळगाव मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. मात्र, नवीन रस्त्याच्या मोऱ्यांचे काम सुरू झाल्याने ठेकेदाराने मात्र सदर विषयात जणीव पुर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी खोदलेल्या मोरीच्या ठिकाणी दिशा दाखवणारे मोठे फलक लावण्यात यावे अशी मागणी नागरीकांनकडून केली जात आहे.