जळगावात आढळला “गुलेन बारे सिंड्रोम”चा पहिला रुग्ण !

0
52

जळगाव -: राज्यभरात गुलेन बारे सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण जळगाव तालुक्यात आढळून आला आहे. विशेष म्हणजे कुठलीही “ट्रॅव्हल्स हिस्ट्री” नसताना मात्र एका ४५ वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत.

जळगाव तालुक्यातील एका भागात रहिवासी असलेली ४५ वर्षीय महिलेला अशक्तपणा, अंगदुखी, खांदे दुखणे, पाठ दुखणे, अचानक चालण्यास-बसण्यास त्रास होणे अशी लक्षणे जाणवली.(केजीएन) कुटुंबीयांनी गुरुवारी दि. ३० रोजी संध्याकाळी ५ वाजता तातडीने या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

Spread the love