जळगाव – अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवून सर्व समाजातील बंधु भगिनी विधार्थी वॄद्ध नागरिक पिडीत व अन्यायग्रस्त समाज बांधवांना न्याय मिळवून अत्याचारा पासुन त्यांचे संरक्षण करण्यासाठी विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या बंधु भगिनींनी एकत्र येवून आक्रमक सामाजिक संघटनेची स्थापना केली. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक धार्मिक व विविध समाजाच्या हिताचे कार्य करण्याचा संकल्प केला.
आक्रमक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मंदाकिनी सोनवणे सचिव प्रल्हाद सोनवणे कार्याध्यक्ष प्रतिभाताई शिरसाठ उपाध्यक्ष स्मिताताई वेद वंदना पाटील महासचिव सुमनताई मराठे खजिनदार डॉ शंकरलाल सोनवणे सहसचिव योगिता शुक्ल कविता इंगळे संघटनसचिव छाया सारस्वत प्रसिद्धि सचिव अनिल सपकाळे सह संघटन सचिव स्नेहा सोनवणे सुजाता वाणी सल्लागार रमेशचंद्र वेद गिताताई शुक्ला कायदेशिर सल्लागार ॲड स्मिता झालटे ॲड सिमा जाधव प्रचार सचिव शोभा कोळी कायदेशिर सदस्य विजया पांडे सुरेश कोहली (पत्रकार) पुंडलीक सपकाळे माजी Dysp राजेंद्र सोनवणे प्रमोद वाणी नारायण पाटील डॉ गोकुल कोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.