जळगावातील एका शाळेत खेळताना अचानक जमीनीवर कोसळल्याने एका नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्याच्या पालकांनी आपल्या मुलाला दुसऱ्या विद्यार्थ्याकडून मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केल्याने या प्रकरणात शाळेच्या सीसीटीव्हींची तपासणी करण्यात येत आहे.
या प्रकरणातील सत्य बाहेर येईपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका पालकांनी घेतल्याने आता उद्या मुलाचे पोस्टमार्टेम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जळगावच्या आरआर विद्यालयात खेळताना अचानक जमिनीवर कोसळल्याने नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यु झाला आहे.कल्पेश वाल्मीक इंगळे असे मृत्यू पावलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून तो जळगावातील कासमवाडी येथील रहिवासी आहे. कल्पेश दुपारी जेवणाचा डबा खाल्ल्यानंतर शाळेत मैदानावर खेळत असताना अचानक तो जमिनीवर कोसळला त्याला रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषीत केले. कल्पेश याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समोर आलेले नाही.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहीतीनुसार खेळताना चक्कर येऊन पडल्याने कल्पेशचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आमच्या मुलाला दुसऱ्या विद्यार्थ्याकडून मारहाण झाली त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शाळेतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीसाठी तब्बल पाच तासापासून कुटुंबीय शाळेतच ठाण मांडून होते. पोलीस उपअधीक्षकांनी या शाळेला भेट देत सीसीटीव्ही आणि डीव्हीआरचा डाटा सोबत घेतला आहे. त्याचीही तपासली केली जाणार आहे.
तब्बल पाच ते सहा उलटूनही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतलेला नाही.त्यामुळे रात्र झाल्याने आता सकाळी शवविच्छेदन केले जाणार आहे.पोलिसांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.मुलाला मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप असून शाळेवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.