जग्गी वासुदेव यांच्यावर झाली इमर्जन्सी ब्रेन सर्जरी; पाहा शस्त्रक्रियेनंतरचा Video

0
53

ईशा फाउंडेसनचे संस्थापक आणि आध्यत्मिक गुर जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मागील चार आठवड्यांपासून डोकेदुखीने त्रस्त होते असे सांगितले जात आहे.

दरम्यान त्यांच्या मेंदूला मोठी सूज आणि रक्तस्त्राव झाल्यानंतर दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

जग्गी वासुदेव यांची तब्यत बिघडल्यानंतर १७ मार्च रोजी अपोलो रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या मेंदुवरील शूज खूपच वाढल्याचे पाहायला मिळले होते. त्यानंतर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. १७ मार्च रोजी इमर्जन्सी ब्रेन सर्जरी करण्यात आली. सध्या जग्गी वासुदेव यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे.

Spread the love