जगनाडे महाराज मंदिरावर वाल्मिक महाराज जयंती संपन्न… 

0
41

हेमकांत गायकवाड

चोपडा– संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने वाल्मिक महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रदेश तेली महासंघाचे अध्यक्ष के. डी. चौधरी यांनी दीप प्रज्वलित करून व वाल्मिक महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी ह. भ. प .भागवत महाराज हातेड, ह-भ-प गोपीचंद महाराज सुंदरगढी चोपडा, ह भ प प्रकाश महाराज ,मुकुंद पाटील, सौ कल्पना ताई पाटील ,महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चे अध्यक्ष देवकांत के. चौधरी , श्रीकांत चौधरी , नैतिक मोरे, वेदांत चौधरी , वैभव पाटील , मदन मिस्त्री, राहुल मिस्त्री आदी बालगोपाळ मंडळी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी के .डी .चौधरी, ह-भ-प गोपीचंद महाराज यांनी वाल्मीक महाराजांची कथा सांगुन सत्संग घडवला. प्रकाश महाराज यांनी आभार मानले.

Spread the love