हेमकांत गायकवाड
चोपडा: -६ एप्रिल २०२१ला नवी दिल्लीमार्फत इ.८वीच्या आर्थिक दुर्बल विदयार्थ्यांसाठीच्या झालेल्या NMMS परीक्षेत, कोरोनाच्या परिस्थितीवर मात करीत (कोरोनामुळे कोणत्याही तासिका झाल्या नाहीत तरी ) खालील दोघी विद्यार्थीनींनी स्वतः फक्त पुस्तकाद्वारे अभ्यास करीत उल्लेखनीय – अभिमानास्पद यश प्राप्त केलंय.. यात जय श्री दादाजी हायस्कूल, तांदळवाडीची
कु. संध्या कोळी( सुकन्या श्री. मच्छिंद्र झिपरू कोळी तांदळवाडी ) ही विद्यार्थीनी घरच्या अत्यंत गरिबीच्या परिस्थितीचा बाऊ न करता SBC विदयार्थ्यांमध्ये जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत ८वी आली आहे. तिच्या ह्या यशाचे विशेष कौतुक…( कारण वडिल मागे झालेल्या एका अपघातात काही दिवस कोमात… त्या नंतर त्यातून जेमतेम वाचले, बरे झाले.. तर बोलायला तकलिफ , काहिसं दिव्यांगत्व आलेलं ..शेती फक्त नावापुरती १ बिघा, ते सध्या बकऱ्या चारण्याचे काम करतात तर आई रोज मोलमजूरीला जाते- शाळा नसेल तेव्हा संध्याही आईसोबत शेतात कामाला जात दोघं मायलेकी संसार गाडा ओढतात .अशा दैन्यावस्थेवर मात केलीय संध्याने…)
शाळेत आम्ही तिला व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती तूम्ही मिळवली पाहिजे यासाठी प्रोत्साहन देत मागे लागायचो …. तेव्हा आम्हांला ‘ मी व माझ्या दोन मैत्रिणी NMMS शिष्यवृत्ती मिळवूच’ असा विश्वास, खात्री कु.संध्या दयायची .. तो आत्मविश्वास सार्थ ठरवित आज ती व तिची खाली उल्लेखित मैत्रिण फक्त स्वयंअध्ययनाद्वारे NMMS शिष्यवृत्तीला पात्र ठरलीय… ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब होय….
दुसरी विद्यार्थीनी
कु. अश्वनी बाविस्कर( सुकन्या श्री.रंगराव गोकूळ बाविस्कर तांदळवाडी) हिनेही स्वयंअध्ययनाद्वारे ही शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.
ती जिल्हयात ST विदयार्थ्यात ३१वी आली आहे. वरील दोन्ही विदयार्थीनींचे व पालकांचे सानंद साभिमान अभिनंदन .