जैन इरिगेशन विरोधात छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यालया समोर उपोषण

0
41

जळगाव – धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथील जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड विरोधात कंपनीचे कर्मचारी तसेच छावा संघटनेच्या वतीने आज सोमवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे.

जोपर्यन्त मागण्या मान्य होत नाही तोपर्यन्त उपोषण सुरुच राहील असे छावा संघटनेचे भिमराव मराठे यांनी सांगीतले या बाबत सविस्तर वृत्त असे की आम्ही आपल्या कार्यालयास व मा. कामगार आयुक्त, जळगांव यांना याविषयी ऑगस्ट 2021 मध्ये निवेदन दिले होते. आम्ही मा. कामगार आयुक्तांना भेटलो असता त्यांनी आम्हाला कंपनीची चौकशी सुरू आहे असे आश्वासन दिले. तेव्हा ही चौकशी कशी व कुठपर्यंत आली हे कळत नाही. तेव्हा कुठलीही त्रुटी न ठेवता जैन कंपनीची पारदर्शक चौकशी करण्यात यावी. यासाठी आम्ही काय करावे ? आम्ही शेवटचा मार्ग म्हणुन आमरण उपोषणास सघटनेचे इतर पदाधिकाऱ्यांबरोबर बसणार आहोत. कपंनी जोपर्यंत काढुन टाकलेल्या मुलांना न्याय देत नाही, ज्यांचे पी.एफ. व इतर हिशोब बाकी आहे त्यांना जोपर्यंत मिळत तोपर्यन्त आमचे उपोषण सुरुच राहिल असे देखील कामगार व छावा संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगीतले . यावेळी

राजु कुमावत,शरद पाटील,मनोज माहिते, कृष्णा शिंदे, सुनिल पाटील, विलास पाटील, पवन माळी ,योगेश पाटील, भुषण पाटील, राजेंद्र पाटील, हेमराज पाटील, इत्यादी उपस्थीत होते .

Spread the love