नर्मदानदीच्या पाण्याने केले शिवलिंग जलाभिषेक
जळगाव – पिंप्राळा परीसरातील सोनी नगर,सावखेडा रोड जवळील स्वयंभू महादेव मंदिराचे जिर्णोद्धारचे काम सुरु असून मंदिरात माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी आणलेल्या नर्मदानदीच्या पाण्याने महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक मंगळवारी करण्यात आले.

यावेळी मधुकर ठाकरे, देविदास पाटील, नरेश बागडे, विजय चव्हाण, भैय्यासाहेब बोरसे, , धनराज कुंभार, विनोद लोखंडे, मुकुंदा निकुंभ, सागर बोरसे आदि भाविक उपस्थित होते.
सोनी नगरातील स्वयंभू महादेव हे जागृत देवस्थान असून या मंदिरात मनोकामना पूर्ण होत असल्याने गणपती नगर, प्रल्हाद नगर, ओंकार पार्क, मयुर कॉलनी, पिंप्राळा ,परिसरातून भाविक मंदिरात येत असतात. मंदिराचे जीर्णोद्धारचे काम सुरु असून दानशूर व्यक्तीने सहकार्य करावे असे आवाहन नरेश बागडे यांनी केले आहे.












