जळगाव चोपडा रस्त्यावर एस टि बस आणि इको कार चा अपघात. जिवीत हाणी नाही.

0
21

प्रतिनीधी अमर पाटील
जळगाव- : चोपड्याहुन जळगाव कडे येणाऱ्या महामंडाळाच्या बसचा व जळगावहुन पेशंट घेऊन जाणाऱ्या ईको कारचा सकाळी 8 र्‍30 वाजेच्या सुमारास अपघात झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि चोपडा आगाराची बस क्रमांक एम एच 14 बि जे 2217 चोपड्याहुन विदगाव मार्गे जळगावला येत असतांना ममुराबाद जळगावच्या मध्ये असलेल्या कृषी शाळेजवळ जळगाव कडुन येत असलेली ईको कार क्रमांक MH 19 CZ 8741 हि भरधाव वेगाने असल्यामुळे बैलगाडीला ओव्हरटेक करत असतांना समोरुन येत असलेल्या बसला धडकली त्यामध्ये दोन्ही वाहानांचे किरकोळ नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीत हाणी झाली नसल्याचे ईको कार मालक शरद सपकाळे यांनी सांगीतले. सदर प्रकरणी तालुका पोलीस स्टेशन मध्ये उशीरा पर्यन्त गुन्हा नोंदवायचे काम सुरु होते.

Spread the love