जळगाव – जळगाव शहर बुधवारी दि. २२ मे रोजी रात्री १० वाजता पुन्हा एकदा खुनाच्या खळबळजनक घटनेने हादरले आहे. एका ३६ वर्षीय तरुणाचा हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेला असताना १० ते १२ अज्ञात मारेकऱ्यांनी येऊन चॉपरने ७ ते ८ वार करून त्याचा निर्घूण खून केला आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
किशोर अशोक सोनवणे (कोळी, वय ३६, रा. कोळी पेठ, बालाजी मंदिराच्या मागे, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. किशोर कोळी हा गुरुवारी दि. २२ मे रोजी रात्री १० वाजता त्याचा मित्र अमोल सोनार उर्फ गंपू व इतर तीन चार मित्रान सोबत कालिका माता मंदिर परिसरात हॉटेल भानू येथे जेवणासाठी गेला होता. तेथे जेवण करीत असताना अज्ञात १० ते १२ चार इसम आले आणि त्यांनी किशोर कोळी यांच्याशी पूर्व वैमनस्यातून वाद घातला. त्यानंतर यातील तीन ते चार जणांनी किशोर कोळी याच्यावर चॉपरने सात ते आठ वार करून त्याचा निर्घुण खून केला.
यावेळी हॉटेलमध्ये पळापळ झाली. मारेकरी हे घटनास्थळावरून पसार झाले. सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.शनिपेठ पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अमोल उर्फ गंपू सोनार याला शनिपेठ पोलीस स्टेशनला नेले असून पुढील माहिती त्याच्या जवळून घेत आहेत. दरम्यान पाच ते सहा महिन्यांपूर्वी मयत आणि मारेकरी यांच्यामध्ये काही वाद झाले होते व त्या वादातूनच हा खून झाला असावा अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहे. मयत किशोर सोनवणे (कोळी) यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे देण्यात आला आहे. याठिकाणी नातेवाईक एकच आक्रोश करीत आहे.