राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत जळगाव शहरातील खेळाडूंना यश

0
38

जळगाव –  महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे दि. 15 ते 17 जुन दरम्यान कामठी, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य अजिंक्यपद 19वी युवा महिलांच्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत पदके पटकावली. 50 ते 52किलो वजनगटात गार्गी पाटील कांस्यपदक, 60 ते 63 किलो वजनगटात अलिशनाज शेख कांस्यपदक पटकावले. प्रशिक्षक म्हणून निलेश बाविस्कर व व्यवस्थापक म्हणून तस्लिम शेख यांनी काम पाहिले आहे. खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी मा. मिलिंद दिक्षीत, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक व जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ. अमोल पाटील, सहसचिव नयन राणे, खजिनदार रोहिदास पाटील, रवी नरवाडे, संतोष सुरवाडे, डॉ. सचिन वाणी, डॉ. सारिका वाणी, सुरज नेमाडे, राकेश पाटील, राकेश मु. पाटील, विशाल बाविस्कर, विजय पाटील व शारदा पाटिल यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Spread the love