रावेर – तहसील कार्यालय येथे आज जळगांव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष सौ. रोहिणीताई खडसे ह्यांच्यावर दिनांक २७ रोजी रात्री १० वाजता झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. ह्या प्रसंगी माजी आमदार अरुणदादा पाटील , तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी , ज्येष्ठ नेते प्रल्हादभाऊ बोंडे ,माजी जि प अध्यक्ष मुरलीधर तायडे , माजी प. स. सदस्य प्रमोद रोझतकर, बाजार समिती माजी सभापती पितांबर पाटील , युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील , ता. सरचिटणीस वाय डी पाटील,ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे ,पंचायत समिती सदस्य योगेश पाटील ,पंचायत समिती सदस्य योगिताताई वानखेडे , महिला जिल्हा सरचिटणीस मायाताई बारी ,महिला तालुका सरचिटणीस सुरेखाताई सोनवणे , कमलताई पंत , आशाताई सोनवणे, निंभोरा माजी सरपंच डिगंबर चौधरी , रावेर शहराध्यक्ष मेहमूद शेख , वडगांव सरपंच धनराज पाटील , युवक जिल्हा उपाध्यक्ष कुणाल महाले, रावेर लोकसभा संघटक शशांक पाटील , सिद्धार्थ तायडे सर , मागासवर्गीय सेलचे कार्याध्यक्ष पंकज वाघ ,जीवन बोरनारे ,चेतन पाटील अरविंद पाटील , अरविंद महाजन ,श्रीकांत चौधरी , गुणवंत भंगाळे , रवी भोगे नवाज पिंजारी , शाहरुख खान ,नदीम शेख , प्रशांत पाटील ,सोनू पाटील चिंतन आसेकर ,आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.











