जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी पुन्हा गुलाबराव पाटील

0
40

जळगाव -: विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि यानंतर मंत्रीपदांचा शपथविधी होऊन देखील अद्याप पालकमंत्री पदांची यादी जाहीर झालेली नव्हती. यातच जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री बदाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून पालकमंत्री पदाची धुरा ही गुलाबराव पाटील यांच्याकडे असली तरी आता भारतीय जनता पक्षातर्फे याचा दावा करण्यात आलेला होता. यामुळे पालकमंत्री पद नेमके कोणाला मिळणार याबाबत मोठीच उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.

या यादीनुसार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
यामुळे आता पाच वर्षांपेक्षा पुढील कालावधीत देखील गुलाबराव पाटील यांच्याकडेच जळगाव जिल्ह्याची धुरा असेल हे आता स्पष्ट झालेले आहे. दरम्यान जिल्ह्यातील मातब्बर नेते तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याची महत्त्वाची धुरा सोपवण्यात आलेली आहे.तर ना. संजय सावकारे यांच्याकडे भंडारा जिल्ह्याची धुरा सोपवण्यात आली आहे.

ना. गुलाबराव पाटील यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये पालकमंत्री पद भूषवले होते. आता या मंत्रिमंडळात त्यांना आधीचेच पाणी पुरवठा व स्वछता हे खाते मिळाले असून सोबत जळगावचेच पालकमंत्री पद मिळायची बाब लक्षणीय मानली जात आहे.

Spread the love