जळगाव-: जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या जागी, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नागपूर लोहमार्ग पोलीसचे एम.राजकुमार यांची नियुक्ती झाली आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील व राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आता राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगाव पोलीस अधीक्षक पदी नागपूर लोहमार्गचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची वर्णी लागली आहे.
दरम्यान, जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची अद्याप पदस्थापना करण्यात आलेली नसून त्याचे स्वतंत्र आदेश पारित होण्याची शक्यता आहे.










