जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

0
12

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी गुरुवारी पिडीत मुलाच्या आईच्या फिर्यादीवरुन एका परप्रांतीय २० वर्षीय तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबधित संशयित आरोपी पिडीत मुलाच्या घराजवळ भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. फिर्यादीत नमुद केल्यानुसार संबधित युवकाने पिडीत मुलाचे काही फोटो मोबाईलमध्ये घेतले होते. त्यानंतर हे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देत, संबधिताने अल्पवयीन मुलावर गेल्या ८ महिन्यांपासून वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य केले.

त्यानंतर पिडीत मुलाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर वेगवेगळे अकांऊट तयार करुन व्हायरल केले. (केसीएन ) त्यानंतर २८ जून रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पिडीत मुलाच्या आईने गुरुवारी परप्रांतीय तरुणावर शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे करत आहेत.

Spread the love