दिपक नेवे
यावल तालुक्यातील राजोरा हे गावा जळगाव जिल्ह्यातील पहीले १०० टक्के कोवीड१९च्या पार्श्वभुमीवर लसीकरण करणारे गाव जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सौ .रंजनाताई पाटील यांनी दिली भेट प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या स्थानिक आरोग्य पथकाचे केले कौत्तुक . दरम्यान मागील दिड वर्षापासून संपुर्ण देशासह राज्यात देखील कोरोना विषाणु संसर्गाने थैमान घातले असुन , या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलीत अनेकांची कुटुंब उद्धवस्थ झालीत अनेक जवळचे मित्र दुरावलीत अशी अनेक संकटे मानवी जिवना देणाऱ्या कोरोना संपुष्टात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न झालीत यात महाराष्ट्र राज्य हे देशातले कोरोनाच्या गोंधळात नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेणारे पहीले राज्य ठरले असुन, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातुन अत्यंत वेगाने कोवीशील्ड या लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवुन उल्लेखनिय कार्य केले .दरम्यान यावल तालुक्यातील भालोद प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत येणारे राजोरा उपकेन्द्राने गाव आणी परिसरात नागरीकांनी कोवीड लसीकरण मोहीमेत १०० टक्के लसीकरणाचे कार्य केले असुन, पहीले कोविडशिल्ड लसीकरण कार्यक्रम हे दिनांक ८ / o४ / २०२११८ते ४४ वर्षाच्या वयोगटातील १९९ दिनांक २३ / ४ / २०२१ला५९ वर्ष वयोगटाच्या १८४ नागरीकांना त्याचप्रमाणे ६० वर्ष वयोगटातील २०२ जणांना तर गरोदरमातांना दिनांक १० ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत असे सर्व वयोगटातील ५८५ पैक्की ५८५ नागरीकांनी घेतले असुन ८९५ लसीकरण डोस देण्यात आलीत तर१५ ऑगस्ट रोजी राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेत दुसरे लसीकरण५५० नागरीकांनी घेतले असुन असे लसीकरणच्या राष्ट्रीय आरोग्य मोहीमेत उत्कृष्ठ कार्य करणारे राजोरा हे जळगाव जिल्ह्यातील पहीले गाव ठहरले आहे . या आरोग्य सेवेच्या उत्कृष्ठ कार्यासाठी भालोद प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिक्षा सुरुशे , डॉ प्राजक्ता चौहान , डॉ . राहुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राजोरा उपकेन्द्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ .जाकीर हुसैन पिंजारी , आरोग्य सहाय्यक राजेन्द्र पालवे, आरोग्य सेविका श्रीमती के आर बोरोले , श्रीमती एस एस पाटील , श्रीमती वैशाली महाजन , आरोग्य सेवक अलताफ देशपांडे त्याचप्रमाणे आशा कार्यकर्ता श्रीमती मनिषा महाजन , श्रीमती मंगला सोनवणे , श्रीमती आशा पाटील , श्रीमती ज्योती ठाकरे , हेमलता नारखेडे , किरण नेहते , हर्षल सोनवणे यांनी महत्वाची कामगिरी बजावली , दरम्यान जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सौ . रंजनाताई पाटील यांनी या ठीकाणी भेट दिली त्यांच्या सोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बी टी जमादार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त ब्ऱ्हाटे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी त्यांचे स्वागत सरपंच सौ . पुष्पा गिरधर पाटील , उपसरपंच दिनेश सिताराम पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर लक्ष्मण सानोने, सौ . रोहीणी वासुदेव बोरोले, सौ सुनंदा भगवान पाटील , श्रीमती सुवर्णा संजय महाजन , ग्रामसेवक पी पी चौधरी, राष्ट्रवादीचे गिरधर पाटील यांनी केले .










