दिपक नेवे
जळगाव जिल्ह्यात वेब मिडिया असोसिएशनला व वेब पोर्टल पत्रकार संघटने’ला जोरदार प्रतिसाद मिळत असुन प्रत्येक तालुक्यात वेब पोर्टल चे पत्रकार मोठ्या संख्येने या संघटनेत सामील होतांना दिसुन येत आहे.आज यावल येथे वेब मिडिया असोसिएशन च्या तालुका पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन नं जी बी बी एस डी, मुंबई -284/2020 या संघटनेची प्रथम बैठक आयोजित करण्यात आली होती.पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना राज्यभर कार्यरत असुन वेब मीडिया म्ह्णून एकमेव संघटना आहे. संघटनेचे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष श्री.अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्री.ईश्वरभाऊ चोरडिया अध्यक्षतेखालील श्री.भानुदास भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली,जिल्हा उपाध्यक्ष श्री.मयुर मेधे , जिल्हा सचिव श्री.दिनेश चौधरी, जिल्हा सरचिटणीस श्री.अमोल व्यहारे, जिल्हा खजिनदार श्री.दिपक पवार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.यावल येथील तालुका पत्रकार व शहर पत्रकार यांच्या बैठकीत सर्वानुमते यावल तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली. यावल तालुका वेब मिडिया असोसिएशन कार्यकारणी पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली तसेच यावल तालुकाअध्यक्ष- पदी .सलीम पिंजारी. यांची नियुक्ती करण्यात आली व तालुका उपाध्यक्ष-.रविंद्र कोलते तालुकाउपाध्यक्ष-.शब्बीर खान तालुका सचिव- .डाॅ.मोहन साळुंखे तालुका सरचिटणीस – .संजय सराफ तालुका समन्वयक-.संजय पाटील तालुका खजिनदार – .शाकीर मलिकयांची यावल तालुका कार्यकारिणी’वर निवड करण्यात आली आहे.तर यावल तालुका कार्यकारिणी वर अनेक सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
वेब मिडिया असोसिएशन यावल तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन व स्वागत होत आहे.