जळगाव पंचायत समितीचा अजब कारभार, जबाबदार अधिकार्यांच्या डोळ्यावर पट्टी,, माहिती आधिकाराच्या सुनावणी पत्रावर मागील वर्षाची तारीख.
जळगाव -: येथील पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मच्यार्याची माहिती माहिती अधिकारान्वये मागितली असता येथील आस्थपना विभागाने चक्क सुनावणीची तारीख 07/05/2021 दिल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की माहिती अधिकार कार्यकर्ते तथा साप्ताहिक जळगाव संदेशचे संपादक श्री महेंद्र सोनवणे यांनी दिनांक 11/03/2022 रोजी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये पंचायत समितीच्या वर्ग 1 वर्ग 2 व वर्ग 3 च्या कर्मच्यार्यांन बाबत अर्ज दिलेला होता. तिस दिवस उलटूनही माहिती न मिळाल्याने दिनांक 26/04/2022 रोजी माहिती अधिकार अधिनीयम 2005 चे कलम 19 (1) अन्वये अपील अर्ज दाखल केला होता त्या अनुशंघाने आज दिनांक 28/05/2022 रोजी पंचायत समितीच्या टपाल विभागा कडुन माहिती अधिकार अपील सुनावणीचे पत्र देण्यात आले पत्रावर सुनावणीची तारीख मात्र 07/05/2021 रोजीची देण्यात आली आहे.
या चुकीच्या तारखेच्या अजब प्रकारामुळे हेतुपुरस्कर माहिती देण्यास विलंब केल्याचे दिसत आहे.अशा बेजबाबदार अधिकारी व कर्मच्यार्यांनमुळे अर्जदारांना मात्र मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

पंचायत समितीचे प्रथम अपिलीय अधिकारी तथा गटविकास अधिकारी हेही झोपेतच
आस्थापना विभागाचे कर्मच्यारी माहिती अधिकार अपिल सुनावणीचे पत्र तयार करतांना झोपलेले असावेत परंतु पंचायत समितीचे प्रथम अपिलीय अधिकारी तथा जबाबदार गटविकास अधिकारी हे सुद्धा सुनावणीच्या पत्रावर सह्या करतांना झोपलेलेच असावे कि काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुनावणीच्या पत्राचे वाचन न करताच डोळे बंद करूण सह्या करत असल्याने येथील कर्मच्यार्याना चांगलेच फावले आहे. कोणावरच कोणाचा धाक राहिलेला नसल्याने असले प्रकार घडत आहे. याबाबत संबंधीतांनवर कारवाई व्हावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार करणार असल्याचे महेंद्र सोनवणे यांनी सांगीतले.












