जळगाव शहरात खुनाचे सत्र सुरुच: कासमवाडीतील तरुणाचा दगडाने ठेचुन खुन

0
31

जळगाव- शहरात खुन झाल्याच्या गुन्ह्याला महिना उलटत नाही तो पर्यन्त जळगावमध्ये आज पुन्हा एका तरूणाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे या तरूणाला दगडाने ठेचून ठार मारण्यात आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील कासमवाडी परिसरात भरणार्‍या आठवडे बाजारातील मच्छी बाजाराच्या भागात आज पहाटे एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. या तरूणाचा चेहरा दगडाने ठेचला असून याची ओळख पटविण्यात अडचण आली. काही वेळाने हा तरूण सागर वासुदेव पाटील ( वय सुमारे २६ वर्षे रा ईश्‍वर कॉलनी आठवडे बाजारासमोर कासमवाडी ) येथील असल्याची माहिती मिळाली.

या तरूणाला दगडाने ठेचून मारले असून याची

माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक

चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक

कुमार चिथा, एमआयडीसेचे पोलीस निरिक्षक

प्रताप शिकारे है घटनास्थळी दाखल झाले

आहेत.

Spread the love