जळगाव -जळगाव शहर महानगरपालिके तर्फे आवाहन करण्यात येते की मानराज मोटर समोरील शहराला पाणीपुरवठा करणारी लाईनमध्ये गळती झाल्याने व वाघुर येथील ते ३३ के .व्ही उच्चदाब वाहिनीवरील केबल दुरूस्तीचे कामामुळे वाघुर पंपिंग स्टेशन ला होणारा वीज पुरवठा दिनांक २ सप्टेंबर सकाळी ९.०० वाजे पासून बंद राहणार असल्याकारणाने जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येत असल्याचे आवाहन जळगाव शहर महानगरपालिका यांनी केले आहे .सदरचा पाणीपुरवठा दिनांक ३ सप्टेंबर रोजी करण्यात येईल .तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे देखील महापालिका प्रशासना कडुन नागरिकांना कळविण्यात आले आहे .












