जळगावच्या पारोळा तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. जळगावच्या पारोळ्यातील म्हसवे फाट्याजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात लोणी येथील पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत.
तर चार जण जखमी झाले आहेत. ज्योती सुधीर पाटील, सुधीर देविदास पाटील असं मयत दाम्पत्याचे नाव आहे. अपघातातील जखमींवर पारोळा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या भीषण अपघातात दोन्ही महागड्या कार चक्काचूर झाल्या आहेत. या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे.
जळगावकडून येणाऱ्या ऑडी कारने पारोळ्यातील म्हसवे फाट्यावर वळण घेत असलेल्या होंडा सिटी कारला जोरदार धडक दिली. दोन्ही कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले. या अपघातात ज्योती सुधीर पाटील, सुधीर देविदास पाटील जागीच ठार झाले. पाटील कुटुंब हे होंडा सिटी JJ 05 R 1247 कारने सुरतहुन पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे चुलत भावाच्या मुलीच्या लग्नासाठी सुरतहुन पारोळा तालुक्यातील लोणी बु येथे जात होते.
या दरम्यान सुधीर पाटील यांच्या कारला म्हसवे फाट्यावर जळगावकडून समोरून येणारी ऑडी क्रमांक डीडी 03 के 6906 ने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. यात नाशिक येथील शिरीष लठ्ठा, उमेश लाने, चालक प्रवीण तागड, मिरज चांदे हे ऑडीमधील नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना पारोळाच्या कुटीर रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. घटनेची महिती मिळताच लोणी, म्हसवे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.