जळगाव – शहरातील नाथवाडा परिसरात ललित प्रल्हाद वाणी वय-४५ रा. सिंधी कॉलनी, जळगाव यांचा गळा चिरून खून केल्याची घटना सोमवारी ३ जून रोजी पहाटे उघडकीला आला आहे.
या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. महिनाभरात हा दुसरा खून आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील नाथवाडा परिसरात ललित वाणी हे सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कामाला आहेत. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कामावरून ते घरी येत असताना सिंधी कॉलनी ते नाथवाडा रस्त्याने ते घरी येत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर त्यांचा मृतदेह मिळून आला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने धाव घेतली. मयत ललित वाणी यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. अज्ञात इसमानी त्यांच्या गळ्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत हे घटनास्थळी पोहचले असून फॉरेन्सिक टीम नमुने घेत आहे.
दरम्यान, हा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला याची माहिती अद्यापसमोर आलेली नाही पोलिसांनी मृतदेह उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष केल्याने वाणी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.