जळगावातून अल्पवयीन तरुणीला पळविले

0
14

जळगाव – शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे.

सर्वत्र शोध घेवूनही कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर बुधवारी २ एप्रिल रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी गुरूवारी २ मे रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहे

Spread the love