जामनेर तालुक्यात वादळी पावसाने शेती व घराचे मोठे नुकसान…

0
47

जामनेर,-वादळी पावसाने झोडपलेल्या ओझर ,रामपूर ,टाकळी, शंकरपुरा या भागात मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान जामनेर शहराच्या प्रथम महिला नगराध्यक्षा सौ. साधनाताई गिरीश महाजन यांनी तात्काळ भेट देऊन नुकसानग्रस्तांना धीर दिला आहे.

https://youtu.be/GlKfllgI7W8

प्रशासकीय यंत्रणेला ताबडतोब पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना लागलीच मदत जाहीर करण्यासंदर्भात सूचना केल्या असून नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना खचून न जाता आदरणीय आमदार श्री गिरीश भाऊ तसेच संपूर्ण भारतीय जनता पार्टी तुमच्यासोबत असून तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहणार असा धीर सौ. साधनाताईंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला!

यावेळी तहसीलदार श्री अरुण शेवाळे, भाजपा तालुका अध्यक्ष श्री चंद्रकांत बाविस्कर, गटनेते डॉ. श्री प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री जितेंद्र पाटील, नगरसेवक श्री आतिश झाल्टे ,नगरसेवक श्री महेंद्र बाविस्कर, श्री सुहास पाटील ,नगरसेवक नसीम भाई, माजी नगरसेवक श्रीराम महाजन, प्रदीप महाजन,श्री दीपक तायडे, नितीन झाल्टे, श्री रवींद्र झाल्टे, श्री रितेश पाटील, श्री विजय शिरसाट, उपस्थित होते

Spread the love