जामनेरच्या तिक्षा जाधवला कराटेत “ब्लॅक बेल्ट” 

0
31

जामनेर (वार्ताहर)

जळगाव – जिल्हा गेन्सीरियू कराटे दो असोसिएशन, चॅम्पियन्स मार्शल आर्ट्स व संजीवनी स्पोर्ट्स अकॅडमी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कराटे प्रशिक्षण शिबिरास सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात तिक्षा विनोद जाधव हिला कराटे “ब्लॅक बेल्ट”मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला.प्रशिक्षक आनंद मोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.तिक्षा ही तळेगावकर कवी विनोद जाधव व सौ.वंदना जाधव (शिक्षिका) यांची मुलगी आहे.असोसिएशनचे अध्यक्ष मा.महापौर विष्णूभाऊ भंगाळे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तर, असोसिएशनचे संचालक राजेश जाधव, महाराष्ट्र गेन्सीरियू कराटे दो असोसिएशनचे सचिव संदीप गाडे सर, राजेश गाडे सर, क्रीडा अधिकारी मिनल थोरात सर, जळगाव जिल्हा टेनिस व्हालीबॉल असोसिएशनचे सचिव प्रशांत कोल्हे, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सनाभाई यांची उपस्थिती होती.प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव अजय काशीद यांनी केले.प्रशिक्षण शिबिरात कराटे प्रशिक्षक अरुण भोसले (छ्त्रपती संभाजी नगर) राजेश गाडे (मुंबई)हे होते.

प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जळगाव जिल्हा कराटे डू असोसिएशनचे प्रशिक्षक जोगिंदर मोर्य, दिगंबर महाजन, आनंद मोरे, धीरज शर्मा, राजेश इंगळे, सत्यनारायण पवार, ज्ञानेश्वर पवार, विशाल मते, उमेश महाजन, प्रविण राव, यश पाटील, सिद्धांत वाणी, दिव्या सोनार, धनश्री पाटील, तिक्षा जाधव, पूर्वा सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Spread the love