हेमकांत गायकवाड
चोपडा: येथील गौरव रवींद्र साळुंखे हे यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन, आय. ए .एस .ही परीक्षा उत्तीर्ण झाले. ते लवकरच जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होतील. त्यांना या मिळालेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार दिनांक 25 सप्टेंबर 2021 रोजी श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, श्रीराम नगर चोपडा येथे सायंकाळी 7वा. प्रताप विद्या मंदिराचे निवृत्त मुख्याध्यापक विद्यावाचस्पती टी. एम. चौधरीसर यांचे अध्यक्ष ते खाली संपन्न झाला. यावेळी गौरव साळुंखे त्यांच्यासोबत त्यांचे पिता रवींद्र साळुंखे व मातोश्री सौ सुरेखा साळुंके यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना गौरव साळुंके यांनी टी. एम. चौधरीसर यांनी माझ्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या परिश्रमाची आठवण करून दिली. हे सर्व श्रेय त्यांनी टी. एम. चौधरीसर व माता आणि पिता याना दिले. आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले की मी, स्वतःला साहेब म्हणून घेण्यापेक्षा मी प्रथम देशाचा सेवक आहे, ही भावना माझ्या मनात कायम ठेवेल. देशाची सेवा करताना सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याच्या संदर्भात आणि तळागाळातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील. असे विचार प्रकट केले .त्यांच्या या विचाराबद्दल उपस्थित जनसमुदायाला विशेष कौतुक वाटले व त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अध्यक्षपदावरुन बोलताना टी. एम. चौधरी सर यांनी गौरव याच्या गुणांचे, त्याच्या कर्तुत्वाचे भरभरून कौतुक केले .तो एक आदर्श अधिकारी म्हणून काम करत असताना महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम करून महाराष्ट्राचे वैभवात भर टाकेल असा विश्वास दाखवत, त्यास, त्याच्या परिवारास, त्याच्या आप्तेष्टांना भरभरून शुभेच्छा दिल्यात .सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष के. डी. चौधरी सर यांनी प्रास्ताविक केले. के. डी .चौधरी सर, टी. एम. चौधरी सर, सौ. सीमा सुनील चौधरी, सुनील हिरालाल चौधरी, प्रशांत सुभाष चौधरी, नारायण पंडित चौधरी आदींच्या शुभास्ते सत्कार करण्यात आला.श्री संताजी जगनाडे
समस्त तेली समाज ,चोपडा .व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान, चोपडा. या संस्थेचे पदाधिकारी व समाज बांधवांनी गौरव साळुंखे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या, यावेळी गौरव चे पिताश्री आर. एस. साळुंखे सर ,माता सौ. सुरेखा रवींद्र साळुंखे ,एकनाथ गुलाबराव पाटील, अरुण साळुंखे,प्रसाद साळुंखे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश तेली महासंघ चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी, ह भ प गोपीचंद महाराज ,देवकांत के. चौधरी आदींनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. प्रशांत चौधरी व महिला अध्यक्ष सौ सीमा चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.