धरणगाव :- तालुक्यात आलेल्या पंचायत राज समितीच्या पथकाला पावसा अभावी व जास्त कामाच्या वेळा अभावी झुरखेडा गावात जाता आले नाही परंतु त्यांनी धरणगाव पंचायत समिती येथे झालेल्या सभेत मध्ये सांगितले की, झुरखेडा गावातील सुरेशआप्पा पवार (पाटील) यांनी गावातील ग्रामपंचायत मार्फत केलेल्या काम व त्यावरील खर्च, शौचालयात केलेला भ्रष्टाचार,१४ वा वित्त आयोगाच्या पैश्याची अफरातफर, मागील ग्रामसेवक यांचेकडून दप्तर गहाळ कसे झाले, दलित वस्तीत व गावातील वस्तीत केलेल्या निकृष्ट कोक्रेटिकरण याची चौकशी,भूमीगत गटार यामध्ये केलेले निकृष्ट दर्जाचे गावात केलेली कामे,गावात बांधलेल्या जिममधील सामानच गायब त्याची चौकशी,लेखा परीक्षण अहवाल,अपंग व्यक्तीसाठी किती निधी खर्च केला याचा तपशील, मासिक सभा घेतांना सरपंच यांची सही नाही ,सूचक अनुमोदन नसतांना कामांना मान्यता कोणी व कशी दिली ,ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य नसतांना सभा कशी चालविली, अश्या कामाची व दप्तर चौकशीची मागणी तक्रारदार यांनी केली होती त्यानंतर पंचायत राज समिती यांनी पंचायत समिती धरणगाव येथे घेण्यात आलेल्या बैठकीत विस्तार अधिकारी बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदार सुरेशआप्पा पवार (पाटील) यांनी केलेल्या तक्रारीचा संपूर्ण अहवाल उद्या दि.२९ सप्टेंबर रोजी विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांना पंचायत राज समितीचे अध्यक्ष याच्या समोर ठेवायचा आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.












