झुरखेडा, ता. धरणगाव – गावात गेल्या चाळीस ते पन्नास वर्षानंतर झुरखेडा ग्रामपंचायतच्या एकहाती सत्तेत बदल जनतेने करून दाखवला त्यात जनतेच्या मनातील लोकनियुक्त सरपंच म्हणून सुरेश गोरख पाटील (सुरेशआप्पा) यांना प्रचंड बहुमतांनी विजयी केले. तर वार्ड क्र. १ मधून एक उमेदवार मीना प्रल्हाद नंनवरे हे बिनविरोध तर दोन जागेत लढत झाली त्यात परिवर्तन पॅनलचे बापू दगा जाधव व माधुरी सुनिल चौधरी हे विजयी झाले. या आधी वार्ड क्र. २ मध्ये १) संजय नामदेव चौधरी २) कल्पना नवल पाटील ३)कांचन दगडु चौधरी व वार्ड क्र. ३ मध्ये १)बबन धोंडू पाटील(नाना) २)विमलबाई रमण विसावे ३)श्रीमती नाजमीन तस्लिम पिंजारी हे बिनविरोध झाले आहेत. असे लोकनियुक्त सरपंच व नऊ सदस्य यांना प्रचंड बहुमताने गावातील जनतेने विजयी करून दिले आहे.
Home जळगाव जिल्हा झुरखेडा ग्रामपंचायत निवडणुकीच्या तिरंगी लढतीत परिवर्तन पॅनलचे जनतेच्या मनातील लोकनियुक्त सरपंच म्हणून...