धरणगाव :- तालुक्यातील झुरखेडा गावातील स्ट्रीट लाईट गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत तसेच गावात विविध ठिकाणी गणपती बसविण्यात आले आहेत तरी गावातील ग्रामसेवक,प्रभारी सरपंच,सदस्य यांचे मात्र दुर्लक्ष केल्यामुळे गावात मात्र अंधेरा कायम रहेगा असे झाले आहे अश्यामुळे गावात चोऱ्या होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही आणि असे झाल्यास त्याला जवाबदार कोण असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.
सविस्तर असे की, मागील अठवड्यात दि.४ सप्टेंबर रोजी महादेव मंदिर परिसरात ग्रामसभा घेण्यात आली होती त्यात गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेशआप्पा पवार (पाटील) यांनी आठ दिवस आधी ग्रामसेवक/प्रभारी सरपंच व गटविकास अधिकारी यांच्या नावे अर्ज करून सांगितले होते की, ग्रामसभेत मागणी केल्यानुसार सर्व दप्तर व हिशोब जवळ ठेवावा मात्र ग्रामसभेत विचारलेल्या घरपट्टी, पाणी पट्टी बँकेत भरणा संदर्भात, १४ वा वित्त आयोगाच्या मिळालेल्या निधीचा वापर कुठे करण्यात आला, गावात केलेल्या कोक्रेटिकरणचे अंदाजपत्रक नुसार न काम झाल्याचे, दलित वस्तीत झालेल्या कोक्रेटिकरण चे कागदपत्र व हिशोब,लेखापरीक्षण अहवाल,स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात किती शौचालय बसविण्यात आले, एल इ डी कधी कधी घेण्यात आहे त्यासाठी किती खर्च झाला, शिक्षण व महिला बालकल्याण अंतर्गत करण्यात आलेला खर्च ,अपंग व्यक्तीसाठी किती खर्च करण्यात आला असे विविध अकरा मुद्द्यांवर सभेचे अध्यक्ष व ग्रामसेवक यांना विचारण्यात आले असता त्याच्याकडून ऐका ही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही त्याशिवाय गावात ग्रामसभेला एकही ग्रामपंचायत सदस्य देखील हजर नव्हते. त्यामुळे अश्या ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे गावातील नागरिकांना खूप मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तसेच सुरेशआप्पा पवार (पाटील) हे व गावातील नागरिक वेळोवेळी दप्तर गहाळ करणे ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार करणे असे अनेक विषयांवर ग्रामसेवक व गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करून देखील त्यावर प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करत नाही त्यामुळे आता प्रशासनावरच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.












