झुरखेडा ग्रामपंचायतीच्या कारभारा संदर्भात केलेल्या तक्रारीचा पंचायत राज समितीकडे गटविकास अधिकारी यांचेकडून अहवाल सादर

0
29

धरणगाव :- तालुक्यात आलेल्या पंचायत राज समितीचे अध्यक्ष व पथकाला पावसा अभावी व जास्त कामाच्या वेळा अभावी झुरखेडा गावात जाता आले नव्हते त्यामुळे त्यांनी धरणगाव पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे (पवार) यांना आदेश देण्यात आले होते की, आपण दि.२९ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद जळगाव येथे होणाऱ्या बैठकीत झुरखेडा ग्रामपंचायतचा अहवाल सादर करावा  त्याअनुषंगाने धरणगाव पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी यांनी पंचायत राज समितीचे अध्यक्ष संजय रायमूलकर यांच्याकडुन आज अहवाल सादर करण्यात आला आहे.

सविस्तर असे की,  झुरखेडा येथील सुरेशआप्पा पवार (पाटील) यांनी गावातील ग्रामपंचायत मार्फत केलेल्या कामे व  खर्च, शौचालयात केलेला भ्रष्टाचार,१४ वा वित्त आयोगाच्या पैश्याची अफरातफर, मागील ग्रामसेवक यांचेकडून दप्तर गहाळ, दलित वस्तीत व गावातील वस्तीत केलेल्या निकृष्ट कोक्रेटिकरण याची चौकशी,भूमीगत गटार यामध्ये केलेले निकृष्ट दर्जाचे कामे, गावात बांधलेल्या जिममधील सामानच गायब त्याची चौकशी,लेखा परीक्षण अहवाल,अपंग व्यक्तीसाठी किती निधी खर्च केला याचा तपशील, मासिक सभा घेतांना सरपंच यांची सही नाही ,सूचक अनुमोदन नसतांना कामांना मान्यता कोणी व कशी दिली ,ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य नसतांना सभा कशी चालविली, अश्या कामाची व दप्तर चौकशीची मागणी तक्रारदार सुरेशआप्पा पवार (पाटील) यांनी केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी धरणगाव यांचे कडून पंचायत राज समितीकडे अहवाल सादर करण्यात आला आहे तरी आता पुढे झुरखेडा ग्रामपंचायत च्या कामाच्या चौकशीला पंचायत राज समिती कडून कोणते वळण घेतले जाते याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे .

Spread the love