धरणगाव :- तालुक्यातील झुरखेडा येथे आज दि. १८ सप्टेंबर रोजी श्री सुरेशआप्पा पवार (पाटील) यांच्या मागणीनुसार गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद व इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या सहकार्याने गावात लसीकरण व रक्तदान शिबाराचे आयोजन करण्यात आले तसेच एकता मित्र मंडळ व गावातील तरुण मित्र मंडळ यांच्या विद्यमान सहकार्याने *भव्य दिव्य असे लसीकरण व रक्तदान शिबीर घेण्यात आले* त्यात गावात एकूण-४२९ लस व निमखेडा गावात एकूण -१२० लस असे दोन्ही गावे मिळून एकूण-५४९ लसीचे डोस गावातील नागरिकांना देण्यात आले व रक्तदान शिबिरात एकूण-२५ पिशवी देण्यात आली असे कार्य आजरोजी पर्यंत गावात कोनाडून ही घेण्यात आलेले नव्हते त्यामुळे गावातील नागरिकांनमध्ये खूप आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच गावातील एकता मित्र मंडळ व गावातील नागरिकांच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले.
शिबिराच्या ठिकाणी धरणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा श्री शंकर शेळके धरणगाव व तहसील चे तहसीलदार मा श्री नितीनकुमार देवरे साहेब यांचा मंडळातर्फे सत्कार देखील करण्यात आला तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ करण पाटील, सर्व नर्स ,आरोग्य साहाय्यक, आरोग्य सेविका, व इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगावचे डॉ शंकरलाल सोनवणे, सौ सीमा शिंदे, दिक्षा पाटील,मंगेश ओतारी, अनवरखाना, ग्रामपंचायत चे ग्रामसेवक रविंद्र निळे, तलाठी सचिन कलोरे,पोलीस पाटील,धरणगाव पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत पाणीपुरवठा शिपाई, आदी मान्यवर व कर्मचारी शिबिराच्या ठिकाणी उपस्थित होते.












