झुरखेडयाच्या लोकनियुक्त सरपंचपदी सुरेशआप्पा पाटील  तर उपसरपंचपदी संजय चौधरी यांची बिनविरोध निवड

0
12

धरणगाव – तालुक्यातील झुरखेडा  ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणूकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी सुरेशआप्पा पाटील, सुशिल चौधरी, राजेंद्र चौधरी, दगडू पाटील यांनी फॉर्म भरले होते त्यात दगडू पाटील यांनी माघार घेत तीन उमेदवार रिंगणात होते त्यांचे ५ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले एकूण १७४० मतदारांपैकी १४८५ मतदान झाले होते व ६ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला या निवडणुकीत जनतेने गेल्या तीस ते चाळीस वर्षाच्या सत्तेला नाकारत दणदणीत पराभव केला त्यात लोकनियुक्त सरपंच म्हणून  सुरेशआप्पा पाटील यांना ८५१ मते तर सुशील चौधरी यांनी ६०९ मते, राजेंद्र चौधरी यांना १० मते व नोटाला १५ मते मिळाली त्यात २४२ मतांनी लोकनियुक्त सरपंच  सुरेशआप्पा पाटील हे विजयी झाले. तर सात सदस्यांची बिनविरोध निवडणूक करण्यात आली होती व दोन जागेसाठी निवडणूक वाढविण्यात आली होती त्यात  बापू जाधव व माधुरी चौधरी हे विजयी झाले.

तसेच निवडणूक निर्णय अधिकारी सतिष कोळी  यांच्या उपस्थितीत संजय चौधरी यांची ३० नोव्हेंबर रोजी उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली. या वेळी लोकनियुक्त सरपंच व उपसरपंच यांनी आपला पदभार स्वीकारला. या वेळी ग्रामसेवक रविंद्र निळे, ग्रामपंचायत सदस्य बबन पाटील, बापू जाधव, सौ.विमलबाई विसावे, सौ.मिना नन्नवरे, सौ.कांचन चौधरी, सौ.माधुरी चौधरी, कल्पना पाटील, नाजमीन पिंजारी यांच्यासह गावातील पानाचंद चौधरी, सोपान चौधरी,मंगल पाटील, साहेबराव पाटील,सोपान पाटील,विजय पाटील,विजय चौधरी, पांडुरंग पाटील,तस्लिम पिंजारी,दिपक चौधरी, भानुदास चौधरी, यशवंत चौधरी, सुनिल चौधरी, रमण विसावे, जुगल चौधरी, डॉ. अनिल चौधरी, अशोक चौधरी, समाधान गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love