प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जिओ चे मोबाईल कार्ड असलेल्या फोन ची रेंज गायब झाली असल्याने जिओ ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.
वास्तविक पाहता सुनसगाव येथे जिओ चे टाॅवर आहे मात्र तरीही रेंज येत नसल्याने जिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अन्यथा जिओ चे कार्ड बंद करून दुसऱ्या कंपनीचे कार्ड घेणार असल्याचे सांगितले जाते आहे.










